धरमपेठ झोन अंतर्गत बीएलओ व सुपरवायझरचे प्रशिक्षण संपन्न
कामकाजाबाबत दिल्या महत्वाच्या सूचना
Date : 15 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन अंतर्गत बीएलओ अर्थात बूथ लेवल अधिकारी (Booth Level Officer) व सुपरवायझर यांचा एसआयआर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Back To Home Page
शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात पार पडलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात बीएलओ व सुपरवायझर यांना मतदार यादी अद्ययावत करणे, एसआयआर प्रक्रियेची अंमलबजावणी, निवडणूक कामकाजातील जबाबदाऱ्या तसेच ऑनलाईन प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मा.जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्या बीएलओ यांचे कामकाज शून्य टक्के आहे, किंवा जे अनुपस्थित राहतील, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल व आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल. या प्रशिक्षणास संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुयोग्य, प्रभावी व पारदर्शक रितीने पार पाडण्यास मदत होणार आहे.