गोरेवाडा तलाव सांडपाण्याने प्रदूषित असल्याचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा
जलप्रदाय विशेष समिती सभापतींना अधिकाऱ्यांची माहिती
Date : 15 Apr 2026
या भेटीदरम्यान सभापती यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून सध्या गोरेवाडा तलावातून पाणी उपसले जात नसल्याची पुष्टी केली. तसेच गोरेवडा तलावातील पाणीसाठा हा फक्त आपातकालीन स्थितीमधील वापरासाठी पर्यायी आहे. आपत्कालीन स्थितीमधेच या तलावातील पाणी वापरतात. तलावातील पाणी स्वच्छ दिसून आले असून, ते उपलब्ध तपासणी अहवालांशी सुसंगत असल्याचे आढळले. तसेच, समिती सदस्यांच्या उपस्थितीत पाण्याचा नमुना घेऊन सविस्तर भौतिक-रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.
तांत्रिक मूल्यांकन अहवाल: गोरेवाडा तलावातील पाणी गुणवत्तेचे परीक्षण
गोरेवाडा तलाव आणि खडक नाला – पाणी गुणवत्ता विश्लेषण अहवाल (तुलनात्मक अभ्यास 2019–2026)
हा अहवाल गोरेवाडा तलावातील पाणी सांडपाण्याने प्रदूषित असल्याच्या अलीकडील माध्यमांतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात येत आहे. प्रत्यक्ष तपासणी आणि भौतिक-रासायनिक विश्लेषणावर आधारित निष्कर्षानुसार हे आरोप वैज्ञानिकदृष्ट्या आधारहीन आढळतात. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमान्ड (BOD) आणि अमोनिया यांसारख्या प्रमुख घटकांवरून तलावातील पाणी स्वच्छ व संतुलित असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे पाण्याचे सर्व घटक निरोगी जलपरिसंस्थेचे द्योतक असून सांडपाण्याचा कोणताही परिणाम आढळत नाही.
पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे खालील चाचण्यांमुळे प्रमाणित होते, त्यातील ५ प्रमुख चाचण्या खालीलप्रमाणे:
१. जैव-रासायनिक ऑक्सिजन मागणी (BOD) : हा सेंद्रिय प्रदूषण मोजण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार १.५ मिलीग्रॅम प्रति लीटर पाण्यात २.० पेक्षा कमी कमी BOD म्हणजे अत्यंत स्वच्छ पाणी. सांडपाण्यात हे 200–600 मिलीग्रॅम प्रति लीटर दरम्यान असते.
२. रासायनिक ऑक्सिजन मागणी (COD) : हा रासायनिक प्रदूषण मोजण्यासाठीचा निर्देशक आहे.
यानुसार अहवालात प्रति लीटर पाण्यात १५ मिलीग्रॅम रासायनिक ऑक्सिजन आढळले. परवानगी मर्यादा ही ५०-२५० मिली ग्रॅंम प्रति लीटर आहे. अत्यंत कमी COD सूचित करते की पाण्यात औद्योगिक किंवा रासायनिक प्रदूषण नाही.
BOD:COD गुणोत्तर (1:10) हे स्वच्छ नैसर्गिक पाण्याचे लक्षण आहे.
३. अमोनिया (NH₃-N): अमोनिया हा सांडपाण्याचा थेट निर्देशक आहे. परिक्षणानुसार पाण्यात अमोनियाचे मूल्य आढळलेले नाही. याचाच अर्थ सांडपाण्याचा कोणताही स्त्रोत तलावात मिसळत नसल्याचे स्पष्ट होते.
४. विरघळलेला ऑक्सिजन (DO) व जैवविविधता : ५ मिली ग्रॅम प्रति लीटर असल्यास DO स्तर योग्य प्रमाणित आहे. तलावात विविध मासे प्रजातींचे अस्तित्व हे निरोगी परिसंस्थेचे लक्षण आहे.
सांडपाणी असल्यास ऑक्सिजन कमी होऊन मासे मृत्यू (fish kill) दिसून येतात, जे येथे आढळलेले नाही
५. 2.5 pH व एकूण विरघळलेले घन (TDS): पीएच विश्लेषणात आढळलेले मूल्य: 8.27, परवानगी मर्यादा: 6.5–8.5, म्हणजे किंचित क्षारीय pH हा निरोगी जलपरिसंस्थेचा संकेत आहे. सांडपाणी असल्यास pH कमी (अम्लीय) होतो.
६. TDS विश्लेषण:
● आढळलेले मूल्य: 198 mg/L
● परवानगी मर्यादा: <500 mg/L
● निष्कर्ष: हे उत्कृष्ट स्तर असून सांडपाण्यामुळे होणारी खनिज वाढ येथे दिसत नाही.