११ 'बीएलओ'ना कारणे दाखवा नोटीस
Date : 15 Apr 2026
राज्याच्या एसआयआर प्रक्रियेत सोपवण्यात आलेल्या जबाबदारीत हलगर्जीपणा करणाऱ्या ११ 'बीएलओ'ना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनपाच्या धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांनी बीएलओ यांना कारणे दाखवा नोटीस बजाविले आहे.
Back To Home Page
यात बीएलओ श्रीमती वैशाली मसराम, श्रीमती निता गुप्ता, श्रीमती जुव्हेना भिसे, श्रीमती रंजीता काळे, श्रीमती लक्ष्मी गोलू, श्रीमती संगीता अँटोनी, श्रीमती पिंकी परतेती, श्रीमती सुनिता वासनिक आणि श्री.रामेश्वर आत्राम अशा एकूण ११ जणांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.