जनगणना प्रगणक व सुपरवायझरच्या मानधनात भरीव वाढ
दोन टप्प्यातील कामासाठी मिळणार २५ हजार रुपये
Date : 16 Apr 2026
यावर्षी होणारी जनगणना डिजिटल पद्धतीने व पूर्णपणे कागद विरहित होणार असून, सर्व अधिकाऱ्यांना जनगणनाचा कामात अचूकता आणि पारदर्शकता राखण्याचे आणि जनगणनेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त व प्रमुख जनगणना अधिकारी डॉ. विपीन दिले आहेत.
जनगणनेसाठी आवश्यक अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असून, सबंधित नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांनी यास राष्ट्रसेवेची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन मनपा आयुक्त व प्रमुख जनगणना अधिकारी डॉ. विपीन केले आहे.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात घरांची यादी करणे व घरांची गणना (एचएलओ) होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची जनगणना (पीई) होणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी प्रगणक व सुपरवायझरांना 9 हजार रुपये दिले जाणार आहे तर दुसर्या टप्प्यातील कामासाठी 16 हजार रुपये असे एकूण 25 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. जनगणना प्रक्रियेत राज्यात विविध पातळीवर काम करणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाची रक्कम जाहीर केली आहे.