डॉ. अभिजीत कोसंबी यांच्या दमदार आवाजाने केलं मंत्रमुग्ध!
भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांची गर्दी
Date : 17 Apr 2026
'साजरी भीम जयंती करू'
कार्यक्रमात डॉ. अभिजीत कोसंबी, गायिका श्रीमती ज्योती बनकर, श्रीमती नेहा तिडके आणि त्यांच्या ग्रुपने 'नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा'……., 'ज्ञान सूर्य तू इसी जगत का'….., 'साजरी भीम जयंती करू'…., आणि 'दलितांचा राजा भीमराव माझा'.., माझं भिमाच नावच कुंकू लावीन रमान,….. 'सोनियाची उगवली सकाळ'…….., 'आकाश मोजतो मी भीमा तुझ्यामुळे'…..,'दिला दणका भीमराव कडाडला'…, यांसारखे भीम गीत सादर केले. " >
कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमात उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, नगरसेविका श्रीमती रेखा निमजे, श्रीमती स्वीटी भिसीकर, नगरसेवक श्री. तुषार लारोकर, श्री. हेमंत बरडे, माजी उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांच्यासह अनेक इतर पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्री.प्रवीण दटके यांच्या हस्ते डॉ. अभिजीत कोसंबी आणि स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण करावे," असे आवाहन आमदार श्री.प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजय पात्रे यांनी केले.
'साजरी भीम जयंती करू'
कार्यक्रमात डॉ. अभिजीत कोसंबी, गायिका श्रीमती ज्योती बनकर, श्रीमती नेहा तिडके आणि त्यांच्या ग्रुपने 'नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा'……., 'ज्ञान सूर्य तू इसी जगत का'….., 'साजरी भीम जयंती करू'…., आणि 'दलितांचा राजा भीमराव माझा'.., माझं भिमाच नावच कुंकू लावीन रमान,….. 'सोनियाची उगवली सकाळ'…….., 'आकाश मोजतो मी भीमा तुझ्यामुळे'…..,'दिला दणका भीमराव कडाडला'…, यांसारखे भीम गीत सादर केले.