पाणी बिलांच्या संबंधित तक्रारींच्या निराकरणाकरिता दोन दिवसीय झोन निहाय शिबीर
पाच झोन मध्ये २० एप्रिल तर पाच झोन मध्ये २२ एप्रिल पासून शिबीर
Date : 17 Apr 2026
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार, स्थायी समिती सभपती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र(बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या देखरेखीत व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर यांच्याद्वारे हे शिबीर आयोजित केल्या जात आहे. विशेष म्हणजे, या शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 'मानक कार्यरत प्रक्रिया' (SOP) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, या शिबिरांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी झोन स्तरावर व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे, तसेच संबंधित क्षेत्रातील नगरसेवकांनाही याची रितसर माहिती देण्याची जबाबदारी झोनच्या 'डेलीगेट'वर सोपवण्यात आली आहे. शिबिर दरम्यान झोनचे डेलीगेट, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ओ.सी.डब्ल्यूचे झोनल हेड आणि सर्विस पॉईंट मॅनेजर (SPM) यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे, जेणेकरून तांत्रिक आणि प्रशासकीय निर्णय जागीच घेता येतील. शिबिरात येणाऱ्या प्रत्येक उपभोक्त्याच्या तक्रारीची नोंद एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये केली जाईल. शक्य असल्यास जास्तीत जास्त तक्रारींचे निराकरण त्याच दिवशी करण्याचा प्रयत्न क्षेत्रीय पथकाद्वारे केला जाणार आहे