जलजन्य आजार, साथरोग नियंत्रण व उष्माघात प्रतिबंधासाठी विशेष प्रशिक्षण व आढावा बैठक
Date : 17 Apr 2026
यावेळी साथरोग प्रतिबंध व नियंत्रणाच्या दृष्टीने पाणी गुणवत्तेचे नियमित परीक्षण (OT Test) तसेच Water Testing Kit चा वापर करून दैनंदिन व मासिक अहवाल सादर करण्याबाबत मार्गदर्शन MSU च्या अन्न व सुरक्षा तज्ञ डॉ. अनुजा मैत्रेय यांनी केले. तसेच उष्माघाताची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर प्रशिक्षण व आढावा MSU चे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथुन खेरडे यांनी घेतला.
प्रत्येक झोनमध्ये High Risk Area मधील पाण्याचे नमुने वारंवार खराब येणाऱ्या क्षेत्रांची यादी तयार करणे, जलजन्य आजारांच्या (Water-borne diseases) दृष्टीने रुग्णांची नोंद ठेवणे, तसेच Heat Action Plan अंतर्गत प्याऊंचे मॅपिंग करणे आणि समाजभवन, शॉपिंग मॉल आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सर्व झोनमधील क्षेत्रीय व प्रभारी आरोग्य निरीक्षकांना केले.
यासोबतच MSU चमूद्वारे करण्यात आलेल्या भेटीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार औषधी भांडार प्रमुखांमार्फत Chloroscope (Chlorine Test Kit) व Toluidine Reagent यांचे सर्व झोनमध्ये वितरण करण्यात आले. तसेच संबंधित क्षेत्रांसाठी OT Kits चे वितरणही करण्यात आले आहे.
सदर बैठकीस मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, MSU चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथून खेरडे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. शुशांकी कापसे, तांत्रिक अधिकारी हर्ष चंदेल, संशोधन सहाय्यक कु. अश्विनी पटेल, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी वाघे, डेटा विश्लेषक श्री. सौरभ नाखले, संवाद तज्ञ श्री. स्नेहल करंजेकर, डेटा व्यवस्थापक श्रीमती हेमाक्षी वानखेडे, बहुउद्देशीय सहाय्यक श्री. नाशिक वालोदे तसेच सर्व झोनमधील क्षेत्रीय/प्रभारी आरोग्य निरीक्षक (Health Inspector) आणि इतर संबंधित अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.