मनपा शाळेतील पटसंख्या वाढीसाठी पटनोंदणी उपक्रम राबविणार
Date : 17 Apr 2026
यामध्ये मनपा शाळातील पटसंख्या वाढीसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विविध सोयी व योजनाची माहिती पालकांना देवुन पाल्यांना मनपा शाळेत दाखल करण्याची विनंती करावी. तसेच सर्व शाळा निरीक्षक यांनी शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी समन्वय साधुन शहरातील विविध भागात जाऊन पटनोंदणी मोहीम राबवावी असे निर्देश दिले. या सभेला श्रीमती डॉ.मेघना वासनकर उपायुक्त(शिक्षण), श्रीमती माधुरी काटकर शिक्षणाधिकारी, म.न.पा. श्रीमती सिमा खोब्रागडे उप.शिक्षणाधिकारी, श्री.सुभाष उपासे सहा.शिक्षणाधिकारी(माध्यमिक), सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.
त्यानुसार मनपातील शाळा निरीक्षक सुध्दा शाळेतील शिक्षकांसोबत शाळेच्या परिसरात विविध भागात जाऊन पटनोंदणी करीत आहेत. या उपक्रमामुळे मनपा शाळेतील पटसंख्या वाढीसाठी सहकार्य होईल.