सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 47 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 17 Apr 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे.केक लिंक यांनी डिसेलटिंग चेंबर नसल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत ज्ञानदीप जनबंधु यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. राज बार अँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.बंडु डिस्पोजल्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. लव कुश लॉजिंग अँड बोर्डिंग यांनी विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अजय किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.लकडगंज झोन अंतर्गत मे.द कॅपीटल बाय नानक ग्रुप यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. जस अकॅडमी समर कॅम्प यांनी विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे.साई आधार यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.