महापौरांच्या जनता दरबारात अनेक प्रश्न लागले मार्गी
Date : 18 Apr 2026
नेहरूनगर झोन अंतर्गत दुर्गा माता मंदिर, विरंगुळा केंद्र, सहकार नगर येथे आयोजित जनता दरबारात नेहरूनगर झोनच्या सभापती श्रीमती सिमा ढोमणे, जलप्रदाय समितीचे उपसभापती श्री. विजय(पिंटू) झलके, नगरसेवक श्री. किशोर कुमेरिया आणि नगरसेविका श्रीमती मंगला गवरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती नंदा येवले, सर्वश्री बाळा विठालकर, प्रीतम देशमुख, संजय, राजू खोडे, अमर टिचकुळे, श्रीमती जया बनाईत, पूनम विश्वकर्मा, श्री. शुभम मुंडले, श्रीमती दुर्गा काळे, श्रीमती वैशाली गोपटे व इतर उपस्थित होते. जनता दरबारात विविध विभागांच्या २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. प्रफुल आसलकर, विभागीय स्वच्छता अधिकारी श्री. आनंद खोडसकर, कनिष्ठ अभियंता श्री. देवचंद काकडे आणि श्री. जयदेव फडतारे, स्वच्छता निरीक्षक श्री. आकाश भोयर. कर निरीक्षक श्री. कैलास ऊके व श्री. संदीप पतंगे, प्र. कर निरीक्षक श्री. किसन बारई व श्री. सचिन मेश्राम, कर संग्राहक श्री. भावेश सेलोकर, सर्वश्री. अमोल तळवेकर, विलास मोहाडीकर, हिरालाल खापरे, श्रीमती मयुरी तिजारे, श्रीमती श्वेता तिडके उपस्थित होते. तसेच याप्रसंगी नागरिकांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा शिबीर पोस्ट ऑफीसच्या सहकार्याने लावण्यात आले होते. या शिबिराला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.