कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याबाबत चार दिवसात निर्णय घ्या
ओसीडब्ल्यूला महापौर यांनी दिले निर्देश
Date : 21 Apr 2026
मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पारपडलेल्या बैठकीत राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश उपाख्य शेरसिंग डागोर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री अंकित. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, उपायुक्त श्री.राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक श्री ओमप्रकाश यादव यांच्यासह ओसीडब्ल्यूचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
बैठकीत सर्वप्रथम आमदार श्री.प्रवीण दटके यांनी ऑरेज सिटी वाटर (ओसीडब्ल्यू) मधील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. ओसीडब्ल्यू मध्ये मीटर रीडर म्हणून कार्यरत ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किंवा समकक्ष कामावर रुजू करून घेण्याची मागणी आ. श्री. प्रवीण दटके यांनी दिली.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी ओसीडब्ल्यू मध्ये कार्यरत सदर कर्मचारी यांना कामावर रुजू करून घेण्याबाबत ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना पुढील चार दिवसात निर्णय घ्यावा, तोपर्यंत ओसीडब्ल्यूला पेमेंट देण्यात येऊन नये, असे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांना दिले. त्यानंतर लाड पागे समितीच्या संबंधित सगळया विषयाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.