अग्नीशमन व विद्युत विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
Date : 21 Apr 2026
मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्यासह इतर नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रंसगी अग्नीशमन व विद्युत विशेष समितीचे उपसभापती श्री. लखन सुमेरा येरवार, श्री. तुषार रविन्द्र लारोकर, श्री. अमोल नानाजी शामकुळे, श्री.बाबाराव अजाबराव तायडे, श्री. संजय रामचंद्रजी अवचट, श्रीमती प्रगती रोहीत यादव, सिराज अहमद अन्सारी, श्रीमती सायमा नाज फैयाज कुरेशी आदी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, कार्यकारी अभियंता(विद्युत) श्री. राजेंद्र राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते.