पाणी बिल तक्रारींच्या निराकरण शिबिरांना दुसऱ्याही दिवशी उत्तम प्रतिसाद
दुसऱ्या दिवशी एकूण ८०५ तक्रारींचे निराकरण-पाच झोन मध्ये आजपासून शिबीर
Date : 21 Apr 2026
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून अनेक ग्राहकांना अवास्तव आणि वाढीव पाणी बिले प्राप्त झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींच्या निराकरणासाठी मनपाच्या जलप्रदाय विभागाद्वारे ऑरेंज सिटी वॉटर यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय तक्रार निवारण शिबिराला दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिरात पहिल्या दिवशी एकूण ५५९ तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीनगर झोनमध्ये १९, हनुमाननगर झोन मध्ये १०, गांधीनगर झोन मध्ये २०२, सतरंजीपुरा झोन मध्ये १८८ तर आशीनगर झोनमध्ये ३८६ अशा एकूण ८०५ तक्रारी प्राप्त झाल्या व त्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले. दोन दिवसांत एकूण १३६४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
Back To Home Page
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार, स्थायी समिती सभपती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र(बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या देखरेखीत व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर यांच्याद्वारे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आजपासून पाच झोन मध्ये शिबीर
मनपाच्या धरमपेठ झोन, धंतोली झोन, नेहरू नगर झोन, लकडगंज झोन व मंगळवारी झोन कार्यालयात २२ व २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ५.०० वाजेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत.