वसुंधरा दिनानिमित्त मनपा आणि ग्रीन व्हिजिलद्वारे जनजागृती अभियान
Date : 22 Apr 2026
या वर्षाच्या अवर पॉवर, अवर प्लॅनेट" थीमनूसार, पर्यावरण संरक्षण ही एक सामूहिक जबाबदारी असून ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. ग्रीन विजिल फाउंडेशनच्या सदस्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांना नवीकरणीय ऊर्जेचा वापर, हरित जीवनशैली, जलसंधारण, कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळणे यासाठी प्रोत्साहित केले. फलक व थेट संवादाद्वारे समुदाय आधारित व्यावहारिक उपाय सांगण्यात आले. सुमारे 500 नागरिकांनी शाश्वत जीवनशैली अवलंबण्याची शपथ घेतली.
अर्थ डे.ऑर्गनाझेशन आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती करुणा सिंह यांनी नागपूर महानगरपालिका व ग्रीन विजिल फाउंडेशन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यास प्रेरित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
अर्थ डे का साजरा होतो?
अर्थ डे ची सुरुवात 1970 साली झाली, अमेरिकेचे सिनेटर गेइलॉर्ड नेल्सन यांनी 1969 मधील सांता बार्बरा तेलगळतीच्या घटनेतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केला. आज अर्थ डे नेटवर्क च्या समन्वयातून हा जगातील सर्वात मोठा जनआंदोलन बनला असून, 195 हून अधिक देशांमध्ये एक अब्जाहून अधिक लोक अर्थ डे हा दिवस साजरा करतात. " >
पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ एप्रिल रोजी जगभरात 'जागतिक पृथ्वी दिवस' साजरा केला जातो. यावेळी अभियानात वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या वर्षी पृथ्वी दिन 2026 दिनानिमित्त "अवर पॉवर, अवर प्लॅनेट" असा पर्यावर रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या अभियानाच्या वेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी ग्रीन व्हिजिलचे श्री.कौस्तभ चटर्जी, कु.सुरभी जयसवाल, श्री.मेहुल कोसुरकर, कु. शीतल चौधरी, श्री. बिश्नुदेव यादव, कु.प्रिया यादव, कु. श्रिया जोगे, श्री. पिनाकी बनिक, श्री. पार्थ जुमडे, श्री. प्रतीक इस्सेम्पेल्लीवार यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
या वर्षाच्या अवर पॉवर, अवर प्लॅनेट" थीमनूसार, पर्यावरण संरक्षण ही एक सामूहिक जबाबदारी असून ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. ग्रीन विजिल फाउंडेशनच्या सदस्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांना नवीकरणीय ऊर्जेचा वापर, हरित जीवनशैली, जलसंधारण, कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळणे यासाठी प्रोत्साहित केले. फलक व थेट संवादाद्वारे समुदाय आधारित व्यावहारिक उपाय सांगण्यात आले. सुमारे 500 नागरिकांनी शाश्वत जीवनशैली अवलंबण्याची शपथ घेतली.
अर्थ डे.ऑर्गनाझेशन आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती करुणा सिंह यांनी नागपूर महानगरपालिका व ग्रीन विजिल फाउंडेशन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यास प्रेरित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
अर्थ डे का साजरा होतो?
अर्थ डे ची सुरुवात 1970 साली झाली, अमेरिकेचे सिनेटर गेइलॉर्ड नेल्सन यांनी 1969 मधील सांता बार्बरा तेलगळतीच्या घटनेतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केला. आज अर्थ डे नेटवर्क च्या समन्वयातून हा जगातील सर्वात मोठा जनआंदोलन बनला असून, 195 हून अधिक देशांमध्ये एक अब्जाहून अधिक लोक अर्थ डे हा दिवस साजरा करतात.