चार दिवसात २०७९ तक्रारींचे निराकरण
पाणी बिल तक्रारींच्या निराकरण शिबिरांना उत्तम प्रतिसाद
Date : 23 Apr 2026
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र(बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या देखरेखीत व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर यांच्याद्वारे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी धरमपेठ झोनमध्ये 92, धंतोली झोनमध्ये 40, नेहरू नगर झोनमध्ये 112, लकडगंज झोनमध्ये 103, मंगळवारी झोनमध्ये 52 अशा एकूण 399 तक्रारी तर चौथ्या. दिवशी धरमपेठ झोनमध्ये 77, धंतोली झोनमध्ये 40, नेहरू नगर झोनमध्ये 73, लकडगंज झोनमध्ये 57, मंगळवारी झोनमध्ये 69 अशा एकूण 316 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे त्वरित निराकरण करण्यात आले. असे एकूण चार दिवसीय शिबिरात २०७९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.