सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 30 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 24 Apr 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून रू. 3200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू. 200 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.2,800 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रू. 1,600 रूपयाची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.वैद्य नर्सिग होम यांनी सी ॲड डी वेस्ट रस्तालगत टाकल्यामुळे रू.5,000 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मेसर्स न्यूरालय ब्रेन स्पाइन अँड नर्व्ह क्लिनिक, रामदासपेठ यांनी विद्युत डीपीवर फलक लावल्याने लावल्यामुळे रू. 5,000 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मेसर्स विस्डम अकॅडमी निकळस मंदिर जवळ, इतवारी यांनी विद्युत डीपीवर फलक लावल्याने लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मेसर्स अन्तिष्कास अकॅडमी, जरीपटका यांनी विद्युत डीपीवर फलक लावल्याने लावल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मेसर्स लॉजिंग बोर्डिंग जनवासा सीआयडी ऑफिस चौक, प्रशांत नगर यांनी बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकल्यामुळे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. असे एकून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.