मनपात सोमवार ४ मे रोजी लोकशाही दिन
Date : 27 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवार ०४ मे २०२६ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने महिन्याच्या पहिला सोमवार 'लोकशाही दिन' म्हणून आयोजित करण्यात येतो.
Back To Home Page
तसेच मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे मनपात प्राप्त होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली काढण्याचे निर्देशित केल्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे “लोकशाही दिन” आयोजित करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने सोमवार ४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. सर्व कक्ष प्रमुख व झोन क्रमांक १ ते १० मधील सहा.आयुक्त यांनी यापूर्वीच्या विभागीय लोकशाही दिन व म.न.पा. लोकशाही दिनांतर्गत प्राप्त तसेच निकालात न निघालेल्या तक्रार अर्जाचे सर्व माहितीसह जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकण्याकरिता व त्यांचा निपटारा करण्याकरिता माहितीसह उपस्थित राहावे असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहे.