धरमपेठ झोनमधील जनगणना प्रशिक्षण वर्गाला आयुक्तांनी दिली भेट
राष्ट्रीय कार्यात उत्साहाने सहभागी होण्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आवाहन
Date : 27 Apr 2026
यावेळी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना आयुक्त डॉ. विपीन यांनी 'स्व-गणना' या संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, "जनगणनेचे हे कार्य एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्व प्रगणकांनी आधी स्वतःची 'स्व-गणना' ऑनलाइन पोर्टलवर करून घ्यावी. जेव्हा तुम्ही स्वतः ही प्रक्रिया पूर्ण कराल, तेव्हाच तुम्ही इतर नागरिकांना ती करण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रेरित करू शकाल. तसेच जनगणनेचे काम केवळ एक जबाबदारी म्हणून न पाहता, राष्ट्र उभारणीच्या कार्यातील एक महत्त्वाचा सहभाग म्हणून पहावे. हे काम करताना आनंद घेत आणि पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ. विपीन यांनी केले.
जनगणनेचे काम अत्यंत अचूक आणि डिजिटल पद्धतीने व्हावे, यासाठी प्रगणकांना सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे. २३ एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या बॅचला २७ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. प्रशिक्षण वर्गात १५० ते २०० प्रशिक्षणार्थी (प्रगणक) उत्साहाने सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणार्थींना तांत्रिक आणि व्यावहारिक माहिती देण्यासाठी तज्ज्ञ श्री. शुभम पवार, श्री. नितीन कापगाते, श्री. साहेबराव पोरडवार, श्री. किशोर वाघमारे आणि श्री. प्रदीप शेंडे यांनी प्रगणकांना 'HLO App' चा वापर आणि माहिती संकलनाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले.