मनपात पथनाट्य द्वारे सेवा हक्क बाबत जनजागृती
‘सेवा हक्क दिन’ निमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
Date : 28 Apr 2026
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी उपस्थितांना शपथ देवोवली. यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, कार्यकारी अभियंता श्री. राजीव गौतम, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. प्रमोद हिवसे, श्री. जितेश धकाते, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शक, वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात ‘प्रगती कला मंच’च्या सहकार्याने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. ‘प्रगती कला मंच’च्या कलावंतांनी प्रभावी गीत व पथनाट्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्ये गायक श्री. विनोद इंगळे, श्री. विद्याधर सरदार तसेच कोरस कलाकार श्री. कांबळे, श्रीमती कोमल इंगोले, कु. लाजश्री नंदागवळी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. पथनाट्याचे आयोजन क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात क्रीडा निरीक्षक श्रीमती उज्वला चरडे यांनी केले.
विविध ठिकाणी कार्यक्रम
नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाचे औचित्यसाधून पुढील दोन दिवस विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. यात फुटाळा तलाव, गांधीसागर तलाव, व्हेरायटी चौक, डॉ. आंबेडकर उद्यान येथे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.