मनपा अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा
मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन
Date : 29 Apr 2026
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात शहराच्या विकासासाठी कार्य केले जात आहे. अशात स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे या पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचे मुखपृष्ठ करताना शहरातील नागरिकांच्या संकल्पेनेतून मुखपृष्ठ तयार व्हावे, या हेतूने स्पर्धा स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतून “अर्थसंकल्पाचे मुखपृष्ठ तयार करण्याची” अभिनव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार 100 व 5 हजार 100 रुपयांचे रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
कलावंतांनी मुखपृष्ठ ए 4 साईजमध्ये तयार करून जेपीईजी व सीडीआर फाईलमध्ये nmcbudget2026@gmail.com या ई-मेल वर येत्या 2 मेपर्यंत या प्रवेशिका पाठवाव्या, व मोठ्या संख्येत सहभागी होत स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.