मनपातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन
Date : 30 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे” अश्या अनेक स्फूर्ती गीताच्या माध्यमातून देशाला एकात्मतेच्या सुत्रात बांधणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
Back To Home Page
नागपूर महानगरपालिकातर्फे उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथे गुरुवारी सकाळी (ता.30) महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच मनपा मुख्यालयातील महापौर दालनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मनपा उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, जनसपंर्क विभागाचे श्री.अमोल तपासे, श्री.प्रमोद बारई, श्री.रविंद्र किंदर्ले, श्री.संजय मेंढुले, श्री जामनकर, श्री. प्रविण वानखेडे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.