उद्यान व मैदानाच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा
सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश
Date : 30 Apr 2026
मनपाच्या खेळ मैदान आणि उद्याने विकसित करण्यासाठी श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीची सभा डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत श्री. मिलिंद मेश्राम, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्री मंगेश खवले, श्री गणेश राठोड, उद्यान अधीक्षक श्री अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री बोरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रभाग निहाय उद्याने आणि खेळ मैदान विकसित करणे आवश्यक आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ मैदान आवश्यक आहे. तसेच नागपूर शहराचा पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उद्याने विकसित करणे गरजेचे आहे. श्री बोरकर यांनी विविध मैदाने आणि उद्यानाचा विकास करतांना स्थानिक नगरसेवक यांच्याशी सुद्धा चर्चा करण्याचे निर्देश दिले. तसेच कोणत्या विभागात कोणत्या प्रकारचे खेळ प्रकार प्रसिद्ध आहे ते खेळ प्रकार तिथे राबविण्याचे सांगितले.
त्यांनी सांगीतले की यासाठी अर्थ संकल्प मध्ये तरतूद करण्यात येणार आहे. यावेळी उपायुक्त श्री मंगेश खवले यांनी स्थावर विभागाची माहिती दिली. त्यांनी सांगीतले की शहरात किती जागा खेळ मैदान आणि उद्यानाकरिता उपलब्ध आहे याचा सर्वेक्षण करण्यात आला आहे. उद्यान विभागाची माहिती उपायुक्त श्री गणेश राठोड यांनी दिली.