चौक आणि रस्त्यांच्या नामकरण करण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे उपमहापौरांचे निर्देश
उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण समितीची बैठक संपन्न
Date : 30 Apr 2026
बैठकी दिलीप वामनराव दिवे, श्रीमती विद्या राजेश कन्हेरे, श्री. रामदास द्वारकाप्रसाद शाहू, श्री. चंद्रकांत मनोहर खंगार, श्री. दीपक मोहन पटेल, श्री. आसिफ शादीक शेख (गुड्डू) प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीमध्ये नामकरणाचे प्रस्ताव नेमक्या कोणत्या प्रशासकीय कार्यपद्धतीने हाताळले जातात, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या प्रकल्प-१ विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटने यांनी या प्रक्रियेची तांत्रिक आणि प्रशासकीय माहिती समिती सदस्यांना दिली. नामकरणासाठी येणारे अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम मंजुरीपर्यंतची प्रक्रिया कशी असते, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आणि शंकांना कार्यकारी अभियंत्यांनी सविस्तर उत्तरे दिली.