नागपूर मनपाची आरोग्य सेवांवर नजर: औषध पुरवठा व सुविधांचा आढावा
नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्याचे आरोग्य सभापतींचे निर्देश
Date : 30 Apr 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सभापती सौ. मनीषा अतकरे, झोनल अधिकारी डॉ. ख्वाजा तसेच स्थानिक नगरसेवक श्री. दिवटे यांच्या उपस्थितीत संयुक्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भांडेवाडी आणि आरोग्य व निरोगीपणा केंद्र, जय दुर्गा नगर येथे भेट देण्यात आली.
Back To Home Page
यावेळी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा तसेच औषधांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.