टाऊन हॉल मध्ये राजे रघुजी भोसलेंसह नागपूरच्या ऐतिहासिक वारसाचे दर्शन घडविणारे दालन उभारा
महापौर निता ठाकरे यांचे निर्देश
Date : 05 May 2026
नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाल भागात नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या 'श्रीमंत रघुजी राजे नगर भवन' (टाऊन हॉल) च्या बांधकामाची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज मंगळवारी(ता.०५) प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन, सर्व बांधकाम विहित कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Back To Home Page
पाहणी दरम्यान महापौरांनी "श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या जीवनावर आधारित आणि नागपूरच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारे एक भव्य दालन या नगर भवनात उभारण्यात यावे," अशी सूचना दिल्या. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी - वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदूरकर, नगरसेवक श्री. सुधीर राऊत, नगरसेवक श्री. सचिन नाईक यांच्यासह इतर नगरसेवक, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम उपस्थित होते.