बेझनबाग येथील लाल शाळेचे गतवैभव परत आणणार
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली शाळेची पाहणी
Date : 06 May 2026
पाहणीदरम्यान मनपाच्या शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, नगरसेविका श्रीमती प्रगती यादव, नगरसेवक श्री. विवेक निकोसे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, श्री. मनोज सिंग, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्रीमती सीमा खोब्रागडे, शाळा निरीक्षक श्रीमती रजीया शाईन, श्रीमती अंजूम आरा, माजी नगरसेवक श्री. विनोद वालदे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी व स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपाच्या अशीनगर झोन मधील बेझनबाग येथे मनपाची इंदोरा नं. १ उच्च प्राथमिक लाल शाळा असून, ती २०१० पासून बंद आहे. बंद शाळेत नर्सरीपासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी मनपाला निवेदन दिले होते. त्यानुषंगाने महापौर यांनी शाळेची पाहणी केली. पाहणीदरम्यान सध्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता श्री. मनोज सिंग यांना दिले. याशिवाय जागेची पूर्ण माहिती, जुने रेकॉर्ड व विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे ही निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले. तसेच येत्या शैक्षणिक सत्रापासून शाळा सुरू करण्याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय गरजेनुसार नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिली. यावेळी शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी लाल शाळेत 'स्मार्ट बालवाडी' पासून शिक्षण सुरू करण्याचे स्थानिक नागरिकांना आश्वासन दिले. मनपा शाळेतील विद्यार्थांना उत्तम सोयीसुविधा प्रदान करण्यासाठी मनपा कटिबद्ध असून, विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण कार्य करीत असल्याचे श्रीमती लढ्ढा यांनी सांगतिले.