झोन कार्यालयातच आता होणार पाणी बिलाच्या तक्रारींचे निराकरण
प्रत्येक झोन कार्यालयात 9 व 10 मे रोजी शिबीर
Date : 06 May 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे व उपसभापती श्री. विजय झलके यांच्या मार्गदर्शनात जलप्रदाय विभागाने शहरातील 10 झोनमध्ये शिबीरे आयोजित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. जलप्रदाय विभागाने यासाठी मानक कार्यरत प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे.
सर्व झोन मध्ये शिबीरे होणार
यानुसार जलप्रदाय विभागाने लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये येत्या 9 व 10 मे रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जलप्रदाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या पाणी बिलाच्या संदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करणार आहेत. या संधीचा नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी केले आहे.