सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 62 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 06 May 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. देवयान-07 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. चंद्रगंगा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. बालाजी शुध्द शाकाहारी भेजनालय यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. हॉटेल ताज बिरयानी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. अनजानी अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. एसआयपी अबॅकस क्लासेस व मे. अभियान अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जयंत स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.जैन किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. एव्हरेस्ट मोमोज् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. गरबा बिरयानी सेंटर यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.