परिवहन व्यवस्थापक डॉ. वासनकर यांनी केले खापरी डेपो व शहर बस निवान्याचे निरीक्षण
Date : 07 May 2026
मनपाच्या परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी बुधवारी (ता.०६) खापरी डेपो व शहर बस निवान्याचे आकस्मिक निरीक्षण केले. यावेळी व्यवस्थापक (ऑपरेशन), श्री. राजीव घाटोळे, श्रम अधिकारी श्री. अरूण पिपरुडे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश शिंगणझोडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Back To Home Page
निरीक्षणा दरम्यान खापरी डेपो येथील निर्माणाधिन प्रशासकीय इमारत व मे. ईका यांचेतर्फे बांधण्यात येणान्या इमारतीचे निरिक्षण करून हे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, असे डॉ. वासनकर यांनी निर्देशित केले. तसेच या डेपोकरीता देण्यात आलेल्या ऑपरेशन प्लॅन नुसार सर्व बसेसचे संचालन करण्याचे निर्देशित केले. वर्धा रोड वरील चिंचभवन बस निवान्यांचे व शिवनगांव फाटा वस निवान्यांचे निरिक्षण केले असता असे निदर्शनास आले की, ही दोन्ही बस निवारे स्वच्छ होती. यानंतर त्याच रोडवरील बस क्र. MH 49 BZ 2860 मधील प्रवाश्यांची तपासणी केली असता बसेसमध्ये उपलब्ध असलेल्या प्रवाश्यांकडे वैध तिकीटा आढळून आले.