नागपुरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ आज
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
Date : 10 May 2026
सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वामध्ये भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्र अभिषेक यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे राहणार आहेत. याशिवाय विशेष पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनवर्सन निधी, न्याय व कामगार राज्यमंत्री श्री. ॲड. आशीष जयस्वाल, खासदार श्रीमती मायाताई ईवनाते, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार श्री. सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार श्री. कृपाल तुमाने, आमदार श्री. संदीप जोशी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. विकास ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र अतिरिक्त आयुक्त श्री मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शना धवड, गांधीबाग झोनच्या सभापती श्रीमती उमा देशमुख, एमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेते श्री. असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनेत्या श्रीमती आभा बिज्जू पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेना (शिंदे) गटनेते श्री. गणेश चर्लेवार, नगरसेवक श्री सुधीर राऊत, नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, नगरसेवक श्री सचिन नाईक, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडे असून, उपायुक्त श्री मंगेश खवले आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.