सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 39 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 12 May 2026
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.12)शोध पथकाने 39 प्रकरणांची नोंद करून 24,700 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून रू.400 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 1,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Back To Home Page
तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत मे. जय वैष्णवी स्वीटस् व मे.साईराम स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. इन्फ्युजन कॉफी, मे. चाप कॉर्नर व निखील सरोदे यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.15,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.25,000 दंड वसुल केला.