रायफल लाईनचे कार्य दीड महिन्यात पूर्ण करा
जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांचे निर्देश
Date : 13 May 2026
बैठकीत नगरसेवक व नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्त श्री. शेषराव गोतमारे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, कर आकरणी व कर संकलन विशेष समिती उपसभापती श्री. सुनील हिरणवार, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती पुजा पाठक, श्रीमती कल्पना द्रोणकर, नगरसेवक श्री विजय होले, नगरसेवक श्री. अभिजित झा, श्री. विनय दाणी, श्री. रामभाऊ आंबुलकर, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांच्यासह मनपाच्या जलप्रदाय आणि ओसीडब्ल्यू अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील पाणी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांनी रायफल लाईनचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक नगरसेवकाला पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक देण्यात यावे, टँकरची संख्या वाढवावी आणि दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. झोनमध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासोबतच, पावसाळ्यापूर्वीच नळाच्या पाईपलाईन साठी खोदलेले खड्डेयाचे योग्य रित्या पुनर्भरण करण्यात यावे बुजविण्यात यावे, त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे असे निर्देशही सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांनी यावेळी दिले.