महापौर निता ठाकरे यांनी केली अंबाझरी तलावाची पाहणी
अधिक मशिनरीचा वापर करून तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून बाहेर करण्याचे दिले निर्देश
Date : 14 May 2026
यापाहणी दौऱ्याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन प्रामुख्याने उपस्थित होते. महापौरांनी जलपर्णी काढण्याच्या कामाचा आढावा घेऊन कामात गती आणण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. सध्या तलावाच्या सुमारे ७ ते ८ एकर परिसरातील जलपर्णी काढण्यात यश आले असून, उर्वरित भागासाठी कामाचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता ४ पोकलेन, १ जे सी बी आणि तीन टिप्पर सध्याची परिस्थितीत कार्यरत आहे.
आयुक्त डॉ. विपीन यांनी तलावात कार्यरत पोकलेनची संख्या वाढवून सहा करण्याचे निर्देश दिले. तसेच तिथे निघालेली जलपर्णी ला दुसरीकडे नेण्याचे निर्देशीत केले. त्यांनी सांगितले की, वाडी नगर परिषद चे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम यावर्षी पूर्ण होणार असून, त्यामधून येणाऱ्या सांड पाणी स्वच्छ होऊन अंबाझरी तलावात येईल. तसेच जलपर्णी काढण्यासाठी मोठी मशीन सुद्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनपातर्फे अंबाझरी मध्ये येणाऱ्या सांड पाणीला थांविण्यासाठी एक मुरुमाचा तात्पुरता बंधारा तयार करण्यात आला असून, यामुळे जलपर्णीच्या विळखा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. योगेश पाचपोर, श्री. विजय होले, श्रीमती वर्षा चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले आणि झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश वासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते.