'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दाखविली माणुसकी
रस्ते अपघातातील जखमी महिलेच्या मदतीला धावले
Date : 14 May 2026
श्रीमती निता ठाकरे,
महापौर, मनपा नागपूर " >
नाईक तलाव परिसराचे निरीक्षण आटोपून महापौरांचा ताफा सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालयाकडे मार्गस्थ होत होता. दरम्यान, श्रीमती विभा पुंडलिक बांगरे (वय ५५ वर्ष) यांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा इजा झाली असल्याचे पाहताच, महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला.
कोणत्याही प्रोटोकॉलची वाट न पाहता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी स्वतः गाडीतून उतरून जखमीची विचारपूस केली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना आधार दिला आणि तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
केवळ मदत करून न थांबता, जखमी श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत याची खातरजमा महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली. लगेच मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापौरांच्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 'पद आणि प्रतिष्ठा' बाजूला ठेवून त्यांनी दाखविलेली ही माणुसकी खऱ्या अर्थाने जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
"लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने मदत मिळणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. आज त्या भगिनीला वेळेत मदत करता आली, याचे मला मोठे समाधान आहे.
श्रीमती निता ठाकरे,
महापौर, मनपा नागपूर