आशीनगर झोन मधे पावसाळी पूर्व दौरा
Date : 14 May 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आशी नगर झोनचे सभापती श्री. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांची पाहणी करण्यासाठी विशेष दौरा आयोजित करण्यात आला.
Back To Home Page
या दौऱ्यामध्ये उत्तर नागपूरातील नगरसेवक श्री. अभिषेक शंभरकर, श्री. दिनेश यादव, श्री. गौतम अंबादे, श्रीमती संगीता सुरेश पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. सतीश पाली यांची उपस्थिती होती.
तसेच झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. निलेश बोबडे, सहाय्यक अभियंता श्री. प्रदीप सरपाटे, स्वास्थ अधिकारी श्री. भोला खोब्रागडे, स्वास्थ निरीक्षक श्री. रोशन जांभुळकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या दौऱ्यात पीली नदी, नोगा फॅक्टरी नाला, चभार नाला, कामगार नगर नाला, गुलशन नगर, वाजरा परिसरातील नाला विविध नदी व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी सर्व नाले व नद्यांची तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.