अनुशक्तीनगर हजारी पहाड परिसरातील नाला आणि पिवळी नदीची सुरक्षा भिंतीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नाला सफाई व पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याचे दिले निर्देश
Date : 16 May 2026
अनुशक्तीनगर हजारी पहाड परिसरातील नाले पाहणी दरम्यान नगरसेवक श्री.योगेश पाचपौर, झोनचे सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, उप अभियंता श्री. प्रमोद मोखाडे, कनिष्ठ अभियंता श्री. पुंडलिक ढोरे, झोनल स्वछता अधिकारी श्री. लोकेश वासनवार तसेच पिवळी नदीची सुरक्षा भिंतची पाहणी दरम्यान आशीनगर झोन सभापती श्री.आसिफ शेख, नगरसेवक श्री. दिनेश यादव, नगरसेविका श्रीमती भावना लोणारे, मनपा उपायुक्त तथा सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. निलेश बोबडे, माजी नगरसेवक श्री. मनोज संगोळे, उपअभियंता श्री. प्रदीप सरपाते, कनिष्ठ अभियंता श्री. मोहन बानाबाकोडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे यांच्यासह परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
अनुशक्तीनगर आणि चिंतामणी नगर हजारी पहाड परिसरादरम्यान नाला आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाणी रहिवासी भागात शिरत असल्याने नागरिकांना समस्यांना समोर जावे लागते. यामुळे स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन या भागाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शनिवारी अनुशक्तीनगर हजारी पहाड परिसरातील नाल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी जेसीबी, पोकलेन आणि गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन नाला सफाई आणि नाल्याचे 2 मीटर पर्यंत खीलीकरण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजूने अतिक्रमण काढणे. झुडपी जंगल जमिनीवर अतिक्रमणबाबत संबधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले.
तसेच पावसाळ्यात पिवळी नदीच्या काठावर असलेल्या रहिवासी भागात पाणी शिरते. परिणामी नागरिकांना प्रचंड समस्यांना समोर जावे लागते. यामुळे स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन या भागाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी पिवळी नदीवरील सुरक्षा भिंतीची पाहणी केली. यावेळी डॉ. विपीन यांनी पावसाळ्यापूर्वी नदीवरील बांधकामाशी संबधित अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत आणि नदीवरील 300 मीटर सुरक्षा भिंत तयार करण्याकरीता प्रस्ताव तातडीने मुख्यालयात पाठविण्यात यावे असे निर्देश झोन सहायक आयुक्त यांना दिले.