सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 54 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 18 May 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. विभा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. अरनेफ फुडव मे. केसानो बार अँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. युरो काईंडस् यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुली करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत संजय मदन यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. चाप कॉर्नर यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले.तसेच मे. सुरेखा इंडस्ट्रीज् यांनी चेंबरवर स्क्रॅपचे साहित्य टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. मोहन किराणा स्टोर व मे. सोनु स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. रेनॉल्ट सर्व्हिस सेंटर यांनी फुटपाथ गाडयांनी गुंतवल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.
आशीनगर झोन अंतर्गत मे.रवि पॅकिंग यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हिचकी ग्रँड रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. प्रदीप एस.रंगारी यांनी बोरवेल खणतांना विनापरवानगी रस्त्यावर पाणी सोडल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 13 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 दंड वसुल केला.