सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 47 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 19 May 2026
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. योगीराज रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. पंकज मेश्राम यांनी जुनी इमारत पाडताना काळजी न घेतल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे.वैद्य रेसीडेंसी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. गुणवंत वेजीटेबल शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. स्कायलाईन शेपर्स एलएलपी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. एबीएस रेस्त्रा यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. आकाश पत्तल यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. गॅलॅक्सी असोसिएटस् यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. द सिटी ढाबा व मे.देसी ग्रिल यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्री किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. राईझींग पब्लिक स्कुल यांनी विनापरवागी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. हरडे किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. वर्मा गृह उद्योग यांनी फुटपाथ गाडयांनी गुंतवल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.बर्गर किंग यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 15 प्रकरणांची नोंद करून रू.90,000 दंड वसुल केला.