मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद विरोधी शपथ
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मनपात आदरांजली
Date : 21 May 2026
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त (ता. २१) मनपाच्या मुख्यालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी कर्मचाऱ्यांना दहशतवादाचा प्रतिवाद करण्याची शपथ दिली.
Back To Home Page
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री अमोल तपासे, श्री. प्रवीण वानखेडे यांच्यासह अग्निशमन जवान यांनीही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे अजनी चौकातील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी माजी नगरसेवक श्री. तानाजी वनवे, श्री. दिलीप पनकुले उपस्थित होते.