श्री. मुरुगानंथम.एम यांनी स्वीकारला अतिरिक्त आयुक्त पदभार
Date : 21 May 2026
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री. मुरुगानंथम एम. (भा.प्र.से) यांनी आज (ता.21) पदभार स्वीकारला. श्री. मुरुगानंथम एम. यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांची भेट घेत आदिवासी कलावंतानी तयार केलेली चित्र भेट म्हणून दिली. तर मनपाच्या आयुक्त डॉ. विपिन यांनी श्री. मुरुगानंथम एम. यांचे स्वागत केले. श्री. मुरुगानंथम. एम हे 2020 च्या भारतीय प्रशासकीय सेवातील अधिकारी आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. नागपूरमध्ये येण्यापूर्वी त्यांनी चंद्रपूर येथे सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनतर गोंदिया आणि बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
Back To Home Page