दुर्बल घटक समिती सभापती हत्तीठेले यांनी स्विकारला पदभार
Date : 22 May 2026
नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समिती सभापती कु.लक्ष्मी हत्तीठेले यांनी शुक्रवार (ता.22) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली.
Back To Home Page
मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री.नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समिती सभापती श्री. विरेंद्र (विक्की) कुकरेजा, यांच्यासह इतर नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समिती सदस्य श्री. योगेश पाचपौर, श्री. किरण मनपिया, श्री. तुषार लारोकर, श्री. योगेश मडावी, श्री. अमोल श्यामकुळे, मनीष बनसोड, विवेक निकोसे, सरस्वती सलामे श्रीमती वर्षा डोंगरे, कु. दुर्गेश्वरी कोसेकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी झोनल सभापती, विशेष समिती सभापती यांच्यासह नगरसेवक व मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.