मोतीबाग येथील नाल्याची मनपा आयुक्तांकडून पाहणी
नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे महारेलला निर्देश
Date : 25 May 2026
याप्रसंगी आशीनगर झोन सभापती श्री. आसिफ शेख, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. निलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे, श्री. सुरेश खरे, महारेलचे श्री. सुशील कुमार शर्मा, श्री. विजय उदापुरे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मोमीनपुरा ते मोतीबाग दरम्यान हा नाला आहे. पासाळ्यात नाल्यातील पाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये जात असल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवक यांनी या भागात भेट देण्याची विनंती मनपा आयुक्त यांना केली होती. त्याअनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मोतीबाग नाल्याची पाहणी केली. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या नाल्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील सर्व कामे, नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व आरसीसी प्री-कास्ट बॉक्स बसविण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे महारेलच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासोबतच नाल्यावरील व रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. तसेच ही कामे करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना केल्या.