सायकल एक्सपोमध्ये विनामूल्य स्टॉल लावण्याची सुवर्णसंधी!..
आधी नोंदणी करणाऱ्यांस प्रथम प्राधान्य ; सेंट सेंट उर्सुला हायस्कूल शाळेत भव्य प्रदर्शनी व विक्री
Date : 29 May 2026
मा. महापौर श्रीमती नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार, शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारत असतानाच पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे आणि नागरिकांचे स्वास्थ्य देखील सुदृढ राहावे, या उद्देशाने “शाश्वत भविष्यासाठी एकत्र सायकल चालवणे” या संकल्पनेवर 'फिट इंडिया' अंतर्गत जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून मनपातर्फे रविवार, 7 जून रोजी सकाळी 6 वाजता शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, सिव्हिल लाईन्स येथील सेंट उर्सुला हायस्कूल येथे भव्य सायकल एक्सपोचे आयोजन करण्यात येणार आहे. या एक्सपोमध्ये स्टॉलधारकांना विविध सायकलींचे भव्य प्रदर्शन व विक्री करता येणार आहे. हे स्टॉल विनामूल्य लावण्याची संधी मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टॉल करिता आधी नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी 9623727213 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.