जखमी कुटुंबासाठी ‘आपली बस’ कर्मचारी ठरले देवदूत
Date : 04 Jun 2026
पती, पत्नी आणि त्यांची मुलगी हे तिघेही अपघातानंतर तीव्र उन्हामध्ये रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. मदतीसाठी हाक मारूनही सुरुवातीला कोणताही प्रवासी किंवा नागरिक त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही.
याच दरम्यान त्या मार्गावरून जात असलेल्या ‘आपली बस’मधील चालक शुभम सार्वे आणि वाहक योगेश वनकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ बस थांबवली. त्यांनी जखमी कुटुंबाची परिस्थिती पाहून त्वरित ‘आपली बस’ नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
बस मधील प्रवाशांच्या सहकार्याने जखमी कुटुंबाला बसमध्ये हलविण्यात आले आणि पुढील उपचारासाठी त्यांना मॅक्स हॉस्पिटल, मानकापूर येथे तातडीने भरती करण्यात आले.
‘आपली बस’ कर्मचारी व प्रवाशांनी दाखवलेल्या या मानवतावादी कृतीचे परिवहन समितीच्या माननीय अध्यक्षा मंगला खेकरे, तसेच NMC आपली बस आणि Chalo Mobility Pvt. Ltd. च्या अधिकाऱ्यांनी पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन चालक व वाहकांचा सत्कार व कौतुक केले.
ही घटना सामाजिक जबाबदारी, संवेदनशीलता आणि सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे, असे परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी अशा शब्दात आपली बसच्या वाहक व चालकाचे कौतुक केले.