मनपा आयुक्तांनी केली जनगणनेच्या कामाची पाहणी
10 जूनपर्यंत जनगणनेची कामे पूर्ण करण्याचे निर्देश
Date : 04 Jun 2026
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी व उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. अशोक गराटे, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, वृक्ष संवर्धक तथा सहायक जनगणना अधिकारी श्री. अमोल चौरपगार, उपअभियंता श्री. प्रशांत नेहारे पर्यवेक्षक श्री. अनिल पराडकर, श्री. अशोक खाडे, श्री अग्रवाल यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे व घरांची गणना (एचएलओ) करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (पीई) केली जात आहे.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सिव्हिल लाइन्स आणि पोलिस लाइन टाकळी येथे भेट देऊन प्रगणक आणि सुपरवायझरमार्फत सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या. त्यांनी प्रगणकांकडून केल्या जाणाऱ्या 'एचएलओ' (HLO) ॲपचा वापर, मोबाईलमध्ये जनगणनेची माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, इतर तांत्रिक अडचणी, तसेच दरदिवशी प्रगणकांकडून एकूण किती घरांची जनगणना होत आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी जनगणनेची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.