नागपूरकरांनी केला वृक्षारोपणाचा महासंकल्प शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातून मोहिमेला प्रारंभ
महापौर, आमदार व नगरसेवकांसह नागरीकांनी घेतली वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा
Date : 05 Jun 2026
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहराची स्वच्छता व संवर्धनासाठी तसेच शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून (ता. 5 जून) ते जागतिक योग दिन (ता. 21 जून) पर्यंत मनपातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मनपाचा वृक्षारोपण महामोहिमेचा उपक्रम या साखळीतील एक भाग आहे. शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. वाढते तापमान व पर्यावरणात होणार्या बदलांचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. धंतोली झोनमधील सुयोगनगर उद्यानात महापौर श्रीमती निता ठाकरे व आमदार श्री. संजय भेंडे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शनी धवड, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर श्री. संदीप जाधव, नगरसेविका श्रीमती विशाखा मोहोड, नगरसेवक श्री. संदीप गवई, नगरसेविका श्रीमती पूजा भूगावकर, नगरसेवक श्री. रितेश गावंडे, नगरसेवक श्री. रमेश भंडारी, श्री. अंकित चौधरीसह इतर नगरसेवक सहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार श्री. संजय भेंडे यांचा नरेंद्रनगर नागरिक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री भूषण केशकर, सुरेश रेवतकर, संजय खोरगडे, संजय सिन्हा,स्वाती लांजेवार, श्रीमती रंजना धकाते, श्रीमती चैताली वानखेडे, श्रीमती छाया पाराशर, श्री. अमित पुजारी, श्री. राजू पागोरे बिट्टू चौहान उपस्थित होते.
स्वच्छतेसाठी संकल्प करावा- महापौर
यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केवळ दिवसासाठी नव्हे तर वर्षभर शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच संवर्धनसाठी विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे रेन हार्वेस्टिंग व सोलरचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.
एक झाड घरासमोर लावा – आमदार संजय भेंडे
मनपाची ही मोहिम स्तुत्य असून प्रत्येकाने एक झाड आपल्या घरासमोर लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार श्री. संजय भेंडे यांनी केले. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वापर कमीतकमी करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पाण्याचा वापर नियंत्रित करावे तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी पाणी जमीनीत मुरण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ श्री. स्वानंद सोनी यांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा व विनाकारण पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन केले. आता आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर पुढील पिढीला त्याचा फटका सहन करावा, असे इशाराही त्यांनी दिला.
कापडी पिशव्यांचे वाटप
यावेळी वृक्षसंवर्धन व स्वच्छेतेसाठी उपस्थितांनी शपथ घेतली. यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करावा, यासाठी यावेळी महिलांना कापड्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्रनगर नागरिक मंडळाचे स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदीग्राममध्ये वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धन पंधरवड्याअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्याहस्ते वाठोडा येथील नंदीग्राम येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे,नेहरूनगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, नगरसेवक श्री.अरुण हारोडे, नगरसेविका श्रीमती शारदा बारई यांच्यासह मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. गणेश राठोड, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, मुख्य स्वछता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, उपभियंता श्री. राजीव गौतम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
गांधीबाग झोन
गांधीबाग-महाल झोन मध्ये वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती उपसभापती मा. श्री. श्रीकांत आगलावे, झोन सभापती श्रीमती उमा देशमुख यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून जनजागृती केली.
नेहरूनगर झोन
नेहरुनगर झोन येथे चिटणीस उद्यानात मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे ज्येष्ठ नगरसेवक पिंटू झलके, मंगला गवरे, IPL स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे क्रिकेटपटू श्री. प्रफुल्ल हिंगे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, ग्रीन व्हिजील फाऊन्डेशन तसेच इतर स्वयंसेवी संस्था देखील उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून जनजागृती केली. यावेळी शहर स्वच्छतेची आणि वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली. नेहरुनगर झोन- चिटणवीस उद्यान या प्रसंगी कौस्तव चटर्जी, सुरभी जायस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, प्रिया जोगे, विष्णुदेव यादव, उपस्थित होते.
सतरंजीपुरा झोन
सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये झोन सभापती श्रीमती अभिरूची राजगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लकडगंज झोन
लकडगंज झोन कार्यालयात वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कर आकारणी व कर संकलन समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांच्यसह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशीनगर झोन
आशीनगर झोनमधील बुद्ध पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आशीनगर झोन सभापती श्री. आसिफ शेख, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व मनपाच्या स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर आंचल वर्मा, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान नगर झोन
हनुमाननगर झोनमधील शारदानगरात उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हनुमानगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, सहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावणकर, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश कलोडे, यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
धरमपेठ झोन
धरमपेठ झोनमधील त्रिकोणी पार्कमध्ये आमदार श्री. विकास ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धंतोली झोन
प्रभाग क्रमांक 33 येथील भगवान नगर मैदानावर सॉलिइकोटेक व भगवान नगर मैदान येथील क्रीडा प्रेमी यांच्या सौजन्याने आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन धंतोली झोन सभापती सौ. भारती विकास बुंडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी नगरसेविका सौ. शीला दिनेश तराळे नगरसेवक मनोज गावंडे, अंकित चौधरी, माजी नगरसेविका सौ. विशाखा बांते व माजी नगरसेवक शरद बांते व यांचे सह मैदानाचे सर्व क्रीडाप्रेमी कार्यकर्ते व संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
गोरक्षण सभा वर्धा रोड
गोरक्षण सभा येथे सकाळी महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर व विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच गोरक्षण सभाचे अध्यक्ष सारंग गडकरी व सचिव प्रसन्न पातुरकर इतर पदाधिकारी उपस्थित होते. यूसीएन न्यूज तर्फे इथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. आशुतोष काळे, श्री. अजय खामनकर उपस्थित होते.