मनपातर्फे आज तलावांची विशेष स्वच्छता मोहीम
Date : 05 Jun 2026
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील अंबाझरी तलाव येथे सकाळी 7.00 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, यांच्यासह झोन सभापती, प्रभागातील सर्वपक्षीय नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या तलावांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तलावांची विशेष स्वच्छता या विशेष अभियानांतर्गत नागपुरमधील वेगवेगळ्या भागांतील तलावांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सोनेगाव आणि अंबाझरी तलाव, तर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पांढराबोडी आणि पोलीस लाईन टाकळी, तसेच दक्षिण नागपूरमधील सक्करदरा तलाव, मध्य नागपूरमधील नाईक तलाव व गांधीसागर तलाव आणि उत्तर नागपूरमधील बिनाकी मंगळवारी तलावाची स्वच्छता करण्यात येणार आहे. करीता शहरातील पर्यावरणप्रेमी नागरीकांनी तलाव स्वच्छता मोहिमेत सहभागी होवून मोलाचे योगदान दयावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले.