विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
आयुक्तांनी केली प्रभाग 10 व 11 मधील विकास कामांची पाहणी
Date : 10 Jun 2026
यावेळी नगरसेवक श्री. शैलेश पांडे, नगरसेविका श्रीमती स्नेहल ठाकरे, नगरसेवक श्री प्रमोद सिंह ठाकूर, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. प्रमोद आत्राम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बोरगाव रोडवरील दिनशॉ फॅक्टरी येथील गडर लाईनची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय त्यांनी पिवळी नदीला लागून असलेल्या वस्तीमधून येणारी गडर लाईन मनपाच्या पंप हाऊसच्या पुढे स्थानांतरीत करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यानुसार ही गडर लाईन स्थानांतरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गोरेवाडा येथील वन जमिनीवरील सामान भांडेवाडी परिसरात हलविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.