नागरिकांनी केला धार्मिक स्थळांवर स्वच्छतेचा जागर
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मनपाचे विशेष अभियान
Date : 10 Jun 2026
शहरातील सर्व झोनमधील धार्मिक स्थळांच्या राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत लक्ष्मीनगर झोन समिती सभापती श्रीमती लक्ष्मी यादव, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, मंगळवारी झोन सभापती श्रीमती सीमा डवरे, हनुमाननगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, धंतोली झोन सभापती श्रीमती भारती बुंदे, नेहरूनगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, गांधीबाग झोन सभापती श्रीमती उमा देशमुख, सतरंजीपुरा झोन समिती सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती श्रीमती महेश्वरी बिसेन, आशीनगर झोन सभापती श्री. आसिफ शेख, परिवहन विशेष समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोष देवी लढ्ढा, विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे, क्रीडा विशेष समिती सभापती सौ. दर्शनी धवड, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, जलप्रदाय समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांच्यासह उपसभापती श्री. सुधीर राऊत, श्री. प्रदीप पोहाणे, श्री. श्रीकांत आगलावे, ॲङ संजय बालपांडे, श्री. संजय चावरे, श्री.विजय झलके, श्री.सुनील हिरणवार संबंधित प्रभागातील नगरसेवक व झोन अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी झोनचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत आज शहरातील सर्व प्रार्थना या अभियानाअंतर्गत लकडगंज झोन मधील प्रभाग 4 मधील आई भवानी नगर येथील आई भवानी मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी मनपाच्या आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती.मनिषा अतकरे, नगरसेवक श्री. शेषराव गोतमारे, नगरसेविका सौ. निरंजना पाटील, झोनल स्वच्छता अधिकारी श्री.मंगेश राऊत यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी स्थानिक नागरिक, भक्तगण,श्रद्धाळू यांनी परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रार्थना स्थळे स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
.
नेहरुनगर झोन- रमणा मारोती
नेहरुनगर झोनमधील प्रसिद्ध श्रद्धास्थळ असलेल्या 'रमणा मारोती' मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला.
या स्वच्छता अभियानामध्ये महापौर श्रीमती निता ठाकरे, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती श्री. विजय (पिंटू) झलके आणि नगरसेविका श्रीमती मंगला गवरे यांनी स्वतः उपस्थित राहून साफसफाई कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. आनंद खोडस्कर तसेच इतर नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन श्रद्धास्थळ स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
यावेळी झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, नगरसेवक श्री. विजय होले, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. लोकश बासनवार, स्वास्थ निरीक्षक राजेंद्र शेट्टी यांच्यासह इतर नगरसेवक, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
लकडगंज झोन - आई भवानी मंदिर
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली. यावेळी लकडगंज झोन मधील प्रभाग 4 मधील आई भवानी नगरातील आई भवानी मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी मनपाच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती सौ.मनिषा अतकरे, नगरसेवक तथा नागपूर सुधान प्रन्यास विश्वस्त श्री. शेषराव गोतमारे, नगरसेविका सौ. निरंजना पाटील, झोनल स्वच्छता अधिकारी श्री.मंगेश राऊत यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी स्थानिक नागरिक, भक्तगण, श्रद्धाळू यांनी परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
हनुमान नगर झोन – चंदननगर मंदिर
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
या अभियानाअंतर्गत शिवसेना (शिंदे) गट नेता श्री.गणेश चर्लेवार, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर झोनल स्वच्छता अधिकारी श्री. दिनशे कलोडे यांच्यासह इतर नगरसेवक, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
आशीनगर – कपिलनगर, हनुमान मंदिर, कपिल नगर बुद्ध विहार
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
या अभियानाअंतर्गत झोन सभापती श्री. आसिफ शेख, नगरसेवक श्री. दिनेश यादव, नगरसेविका श्रीमती भावणा लोणारे, श्रीमती संगीता पाटील, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे यांच्यासह इतर नगरसेवक, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
धंतोली झोन – खंडोबा मंदीर
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
यावेळी नगरसेवक श्री. मनोज साबळे, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार,झोनल स्वच्छता अधिकारी श्री. राजेश गायधनी यांच्यासह प्रभागातील संबधित नगरसेवक, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
गांधीबाग झोन - कल्याणेश्वर मंदिर
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
यावेळी महिला व बालकल्याण समिती विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर,नगरसेवक श्री. सुधीर राऊत,नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. सुरेश खरे यांच्यासह संबधित प्रभागातील नगरसेवक, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
राम मंदिर, जयप्रकाश नगर
मनपाद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ५ ते २१ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या 'विशेष स्वच्छता अभियानांतर्गत श्रद्धास्थळाची व्यापक स्वच्छता करण्यात आली.
यावेळी ग्रीन व्हिजील फाऊंडेशने कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, शितल चौधरी, प्रिया यादव, पिनाक बनिक, प्रतिक इसमपल्लेवार, अनिकेत जोशी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक श्री दीपक रंगारी, मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी श्रद्धास्थळ परिसरातील साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.