पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नेहरूनगर झोन मधील विकास कामांची आयुक्तांकडून पाहणी
Date : 11 Jun 2026
नेहरूनगर झोनमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची तसेच वाठोडा व पारडी भागातील एसटीपी, नंदनवन भागातील वाहतूक कोंडी व अतिक्रमण समस्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. या पाहणीच्यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नेहरूनगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती श्री. विजय झलके, नगरसेविका श्रीमती रजनी वानखेडे, नगरसेवक श्री. प्रवीण गिरे, नगरसेवक श्री. निलेश गायधने, नगरसेविका श्रीमती मंगला गवरे यांच्यासह सहाय्यक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. प्रफुल आसलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विपीन यांनी पारडी व वाठोडा परिसरातील नाग नदीची पाहणी केली. पारडी येथील एसटीपी परिसरात जलपर्णी काढून टाकण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. सेंट झेवियर शाळेजवळील नाग नदीच्या भिंतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी वाठोडा भागातील नाग नदीला सुद्धा दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी सभापती श्रीमती सीमा ढोमणे यांनी केली. नाग नदीच्या संरक्षण भिंत नसल्याने वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. पारडी व वाठोडा परिसरातील नाग नदीचे सुरू असलेली पावसाळापूर्व पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. वाठोडा भागातील नाग नाल्याची संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
अतिक्रमण हटाव कारवाई
याशिवाय नंदनवन परिसरातील राजेंद्र चौक ते जगनाडे चौक या दरम्यान असलेले अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भातही यावेळी आयुक्तांनी प्रवर्तन विभागाच्या अधिकार्यांना दिले. या निर्देशानुसार नेहरूनगर झोनच्या प्रवर्तन विभागाने तात्काळपणे हे अतिक्रमण काढून टाकण्याची यशस्वी कारवाई केली. यामुळे वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे.